सीबीएसई १०वीचा निकाल पुढे ढकलला, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

आज सीबीएसई १०वीचा निकाल लागणार होता. पण सीबीएसईनं दहावीचा निकाल पुढे ढकलला आहे. 

Updated: May 27, 2015, 09:40 AM IST
सीबीएसई १०वीचा निकाल पुढे ढकलला, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम title=

नवी दिल्ली: आज सीबीएसई १०वीचा निकाल लागणार होता. पण सीबीएसईनं दहावीचा निकाल पुढे ढकलला आहे. 

निकाल आज लागणार असं सीबीएसई बोर्डानं आपल्या वेबसाईटवरुन जाहीर केलं होतं, पण काल रात्री त्यांनी ही माहिती वेबसाईटवरुन काढून टाकल्यानं विद्यार्थी पालक संभ्रमात आहेत. 

सीबीएसई बोर्डाला देशभरातल्या प्रत्येक विभागाचा निकाल एकाच दिवशी लावायचा असल्यानं निकाल पुढं ढकलल्याची माहिती मिळतेय. पण ऐनवेळी हा बदल केल्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ उडाला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.