जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तानातून लवकरच सुटका - सुभाष भामरे

नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तान लवकरच सुटका करेल अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिलीय. 

Updated: Jan 12, 2017, 11:11 AM IST
जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तानातून लवकरच सुटका - सुभाष भामरे title=

नवी दिल्ली : नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाण यांची पाकिस्तान लवकरच सुटका करेल अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिलीय. 

चंदू चव्हाण हे धुळ्यातील जवान असून ते चुकून पाकिस्तानच्या हद्दीत पोहचले. तेव्हापासून चंदू चव्हाण पाकिस्तानच्या कैदेत आहेत. यानंतर भारताकडून चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु आहेत. 

सुरुवातीला चंदू चव्हाण आपल्या भूमीत आलेच नसल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. मात्र त्यानंतर चंदू चव्हाण पाकिस्तानातच असून त्यांची चौकशी सुरु असल्याची कबूली दिलीय. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात डीजीएमओ स्तरावरील चर्चा सुरु आहे. 

15 ते 20 वेळा ही चर्चा झाली असून पहिल्यांदाच पाकिस्तानकडून चंदू चव्हाण यांच्या सुटकेबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्र्यांनी दिलीय.