बाबरी, गुजरातचा बदला घेण्यासाठी परतणार , ठाण्यातल्या दहशतवाद्याची धमकी

दहशतवादी संघटना 'इसिस'नं भारतात दहशतवाद घडवून आणण्याची धमकी देणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. उल्लेखनीय म्हणजे, महाराष्ट्रातल्या ठाण्यातून पळून जाऊन इसिसमध्ये भरती झालेला इंजिनिअरींगचा एक विद्यार्थीही या व्हिडिओत भारताविरुद्ध गरळ ओकताना दिसतोय. 

Updated: May 21, 2016, 12:59 PM IST
बाबरी, गुजरातचा बदला घेण्यासाठी परतणार , ठाण्यातल्या दहशतवाद्याची धमकी title=

मुंबई : दहशतवादी संघटना 'इसिस'नं भारतात दहशतवाद घडवून आणण्याची धमकी देणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. उल्लेखनीय म्हणजे, महाराष्ट्रातल्या ठाण्यातून पळून जाऊन इसिसमध्ये भरती झालेला इंजिनिअरींगचा एक विद्यार्थीही या व्हिडिओत भारताविरुद्ध गरळ ओकताना दिसतोय. 

'इंडियन एक्सप्रेस'नं दिलेल्या माहितीनुसार, अरबी भाषेत असणाऱ्या या व्हिडिओत ठाण्याचा रहिवासी असलेला फहाद तनवीर शेखही दिसतोय. 'आम्ही भारतात परतणार... हातात तलवारी घेऊन, बाबरी, कश्मीर, गुजरात आणि मुजफ्फरनगरमध्ये मारल्या गेलेल्या मुसलमानांचा बदला घेणार' असं फहाद या व्हिडिओत म्हणताना दिसतोय. 

'भारतातल्या लोकांकडे तीन पर्याय आहेत... इस्लाम कबूल करा, जजिया द्या नाहीतर मग नरसंहारासाठी तयार राहा' असं तो या व्हिडिओत म्हणतोय. आता आपण अबू अमर अल-हिंदी असे टोपणनाव धारण केल्याचंही तो म्हणतोय. 

२०१४ मध्ये गचानक गायब झालेला फहाद सीरियात जाऊन इसिसमध्ये भरती झाला होता. त्याच्यासोबत आणखी तीन मित्रही होते. यापैंकी आरिब मजीद हा भारतात परतलाय. सध्या तो राष्ट्रीय चौकशी समिती (एनआयए) च्या ताब्यात आहे. तर त्यांचा आणखी एक भारतातून आलेला साथीदार शमीम टंकी हवाई हल्ल्यात मारला गेलाय, त्याला फहाद या व्हिडिओतून श्रद्धांजली वाहिलीय.