गुजरातच्या अमुल दुग्धसंघावर पुन्हा काँग्रेस

गुजरातमधील अमुल दुग्धसंघावर काँग्रसने पुन्हा एकदा आपली सत्ता कायम राखली आहे. संचालक मंडळाच्या ११ जागांपैकी ९ जागा काँग्रेसने जिंकून, देशातील पहिला सहकारी दुग्धसंघ म्हणून ओळख दुग्धसंघावर एकहाती सत्ता मिळवली आहे. 

Updated: May 13, 2015, 08:05 PM IST
गुजरातच्या अमुल दुग्धसंघावर पुन्हा काँग्रेस title=

आणंद : गुजरातमधील अमुल दुग्धसंघावर काँग्रसने पुन्हा एकदा आपली सत्ता कायम राखली आहे. संचालक मंडळाच्या ११ जागांपैकी ९ जागा काँग्रेसने जिंकून, देशातील पहिला सहकारी दुग्धसंघ म्हणून ओळख दुग्धसंघावर एकहाती सत्ता मिळवली आहे. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पिछेहाट झालेल्या काँग्रेसला या लागोपाठच्या यशामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे.  या विजयामुळे काँग्रेसचे रामसिंग परमार सलग चौथ्यांदा अमुल दुग्धसंघाच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. 

या निवडणुकीत काँग्रेसप्रणित अमुल विकास पॅनेलला १३ पैकी ९ जागांवर तर भाजपप्रणित पॅनलला अवघ्या एका जागेवर यश मिळाले आहे. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. तर उर्वरित दोन जागांवर निवडणुकीत लढविण्यात आली नाही. त्यामुळे आता संचालक मंडळापैकी १० जागांवर काँग्रेस आणि एका अपक्षासह उर्वरित तीन जागांवर भाजपची सत्ता राहणार आहे. 

गुजरात सहकारी दुग्ध विपणन फेडरेशनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राज्यातील एकूण १७ दुग्धसंघांमध्ये अमुलचा वरचष्मा आहे. विशेष म्हणजे उर्वरित १६ दुग्धसंघांवर भाजपची सत्ता असली तरी अमुलच्या रूपाने असलेले काँग्रसचे संस्थान खालसा करण्यात भाजपला अपयश आले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.