छोटा राजनच्या अटकेमुळे पाकिस्तानचं धाबं दणाणलं; दाऊदच्या सुरक्षेत वाढ

भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर छोटा राजन याला इंडोनेशियात अटक झाल्यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. आपलं पितळ उघडं पडू नये यासाठी आता पाकिस्ताननं दहशतवादी-गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या सुरक्षेत वाढ केलीय. 

Updated: Nov 3, 2015, 11:30 AM IST
छोटा राजनच्या अटकेमुळे पाकिस्तानचं धाबं दणाणलं; दाऊदच्या सुरक्षेत वाढ title=

नवी दिल्ली : भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर छोटा राजन याला इंडोनेशियात अटक झाल्यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. आपलं पितळ उघडं पडू नये यासाठी आता पाकिस्ताननं दहशतवादी-गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या सुरक्षेत वाढ केलीय. 

अधिक वाचा - मरेपर्यंत दहशतवादाविरोधात लढणार - छोटा राजन

दाऊद इब्राहिमला पाकिस्ताननंच शरण दिल्याचं कित्येकदा समोर आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सेनेनं आता दाऊदच्या सुरक्षेसाठी कराची आणि इस्लामाबादच्या दाऊदच्या निवासस्थानांवर विशेष कमांडो तैनात केलेत. 

आणखी वाचा - काळ्या धंद्यातून जमा केलेली छोटा राजनची डोळे दीपवणारी संपत्ती

२५ ऑक्टोबरला बालीमध्ये झालेल्या छोटा राजनच्या अटकेनंतर पाकिस्तानला आता दाऊदच्या अटकेची भीती वाटतेय. मंगळवारी किंवा बुधवारी इंडोनेशियाकडून छोटा राजनला भारताकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे.

मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटानंतर गेल्या दशकांहून अधिक काळापासून भारताला दाऊद हवाय. अटकेनंतर छोटा राजननंच दाऊदला पाकिस्तानच्या आसएसआयची सुरक्षा मिळत असल्याचं उघड केलंय. पाकिस्तान मात्र आजवर 'मी नाही त्यातली...' अशीच भूमिका घेत दाऊदचची आपल्याला काही माहिती नसल्याचं सांगत आलंय. 

आणखी वाचा - छोटा राजनची तुरुंगातही हाणामारी; दुसऱ्या सेलमध्ये हलवलं

छोटा राजन आणि दाऊद एकेकाळचे सहकारी... छोटा राजन दाऊदचा हस्तक म्हणून काम करत होता. परंतु, दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झालं... २००० साली छोटा राजनवर जीवघेणा हल्लाही झाला होता. दाऊदच्या लोकांनी बँकॉकच्या एका हॉटेलमध्ये छोटा राजनला पकडलं होतं परंतु, नाट्यमय पद्धतीनं तिथून निसटून जाण्यात राजनला यश मिळालं होतं... छोटा राजनच्या अटकेमुळे दाऊदच्या अडचणींत निश्चितच वाढ झालीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.