उत्तर भारतातही थंडीने गारठला, रेल्वे-रस्ते वाहतुकीवर परिणाम

उत्तर भारतातही थंडीचा जोर वाढतच चाललाय. त्यामुळे  रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. 

Updated: Jan 23, 2016, 01:52 PM IST
उत्तर भारतातही थंडीने गारठला, रेल्वे-रस्ते वाहतुकीवर परिणाम title=

नवी दिल्ली : उत्तर भारतातही थंडीचा जोर वाढतच चाललाय. त्यामुळे  रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. 

संपूर्ण उत्तर भारत दाट धुक्याखाली दडून गेलाय. दिल्लीत तापमान ४ अंश सेल्सीअस इतकं झालंय तर कारगीलमध्ये पारा उणे १६अंशांवर गेलाय.

 

दाट धुक्यामुळे विमानसेवा, रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. दिल्लीत धुक्यामुळे ३० ट्रेन रद्द करण्याची वेळ आली. 

महाराष्ट्रात दवबिंदू गोठले
नंदूरबार जिल्ह्यातील डाब परीसरात दवबिंदू गोठले असल्याची माहीती समोर येतेय. गवताच्या पात्यावरील दव गोठल्याने या भागाचा पारा ३ अंश सेल्सियपर्यंत खाली घसरलाय.हा परीसर सातपुडा डोंगर रांगांमध्ये असून दरवर्षी या भागात दवबिंदू गोठले जातात. वर्षशभर या भागात तापमान इतर भागांच्या तुलनेत कमी असते.

नागपूर गारठले
नागपुरातही पारा ५.१ अंशांपर्यंत खाली घसरलाय. गेल्या १० वर्षातला सर्वात कमी तापमान शहरात नोंदलं गेलंय. गेल्या १० वर्षात सर्वात कमी तापमान या आधी ९ जानेवारी २०१३ ला ५.६  अंश सेल्सियस होते. आजवरचे सर्वात कमी तापमान ३.९ अंश सेल्सियस ७ जानेवारी १९३७ला होते. आज गेल्या १० वर्षातला सर्वात थंड दिवस ठरलाय.