बिहारमध्ये लोकशाहीचा विजय, बिहारी आणि बाहरी वाद संपला - शत्रुध्न सिन्हा

 भाजपचे नेते शत्रुध्न सिन्हा यांनी नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली जेडीयू महाआघाडीच्या शानदार विजयाबद्दल आपल्या 'बिहारी बाबू' स्टाइलमध्ये अभिनंदन केले आहे. 

Updated: Nov 8, 2015, 02:00 PM IST
बिहारमध्ये लोकशाहीचा विजय, बिहारी आणि बाहरी वाद संपला - शत्रुध्न सिन्हा  title=

नवी दिल्ली :  भाजपचे नेते शत्रुध्न सिन्हा यांनी नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली जेडीयू महाआघाडीच्या शानदार विजयाबद्दल आपल्या 'बिहारी बाबू' स्टाइलमध्ये अभिनंदन केले आहे. 

भाजप खासदार शत्रुध्न सिन्हा यांनी जेडीयू आणि आरजेडीच्या विजयाला लोकशाहीचा तसेच बिहारच्या जनतेचा विजय आहे. त्यांना सॅल्यूट करतो. बिहारमध्ये लोकशाहीचा विजय झाला आहे आणि बिहारी आणि बाहरीचा वाद संपला आहे. 

सुरूवातीच्या कल हाती आले तेव्हा भाजप आघाडीवर होते. पण नंतर जसजसे आघाडी कमी झाली तसतसे भाजप कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडत होता. 

भाजपने पराभव स्वीकारला 
बिहारमधील निवडणूक निकालांनुसार राज्यात महाआघाडी पुन्हा सत्तेवर येत आहे. भाजपने आपला पराभव स्वीकारला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी म्हटले की विरोधी पक्षाच्या एकतेने आम्हांला पराभूत केले. 

मोदींनी केले नितिशचे अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जेडीयू नेते नीतीश कुमार यांना फोन करून बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या महाआघाडीला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. 

मतदानात जेडीयू-आरजेडी-काँग्रेस आघाडी भाजपच्या पुढे गेल्यावर मोदी यांनी ट्विट केले आणि श्री नितीश कुमार यांच्याशी टेलीफोवर बोलणं झाले आणि त्यांना विजयाबद्दल अभिनंदन म्हटले आहे. 

यानंतर लगेच नितीश कुमार यांचे ट्विट आले की, आताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला होता, त्यांनी माझे अभिनंदन केले... धन्यवाद मोदीजी!'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.