जगातील पहिल्या महाकाय हत्तीला आदिमानवाने ठार मारले

काश्मीर घाटीमध्ये आदीमानवाने जगातील सर्वात महाकाय असणाऱ्या हत्ती ठार मारल्याचे सांगण्यात येत आहे. प्रचंड महाकाय हत्तीला ५० हजार वर्षांपूर्वी मारल्याचे मिळालेल्या अवशेषावरुन स्पष्ट झालेय.

Updated: Jan 10, 2016, 04:17 PM IST
जगातील पहिल्या महाकाय हत्तीला आदिमानवाने ठार मारले title=

जम्मू : काश्मीर घाटीमध्ये आदीमानवाने जगातील सर्वात महाकाय असणाऱ्या हत्ती ठार मारल्याचे सांगण्यात येत आहे. प्रचंड महाकाय हत्तीला ५० हजार वर्षांपूर्वी मारल्याचे मिळालेल्या अवशेषावरुन स्पष्ट झालेय.

दरम्यान, हाती सापडलेल्या जीवाश्मावरुन तसे दिसत असले तरी याचा अभ्यास पूर्ण झालेला नाही. मात्र, मिळालेल्या अवशेषाबरोबर काही दकडी हत्यारे मिळाली आहेत. या हत्यारांने प्रचंड हत्तीची शिकार केल्याचे सांगण्यात येत आहे.

या हत्तीचे काही अवशेष आणि डीएनएसाठी सॅंपल मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, यात यश आलेले नाही. या हत्तीचे अवशेष पंपोर येथील करेवा डोंगर पहाडीत सापडलेत. हे अवशेष मातीमध्ये दबलेले होते.

सापडलेले अवशेष जम्मू युनिव्हर्सिटीच्या वाडिया म्युझिअम ऑफ नॅचरल हिस्ट्री येथे सुरक्षित ठेवण्यात आलेत. ज्यावेळी महाकाय हत्तीला मारले गेले त्यावेळी त्याचे वय २५ वर्षे होते. जबड्याचा काही भाग आणि दात याचा या जीवाश्मात समावेश आहे. काही हाडेही आहेत. जीवाश्माबरोबर ६३ हत्यारे मिळालीत. या हत्यारांवर रक्ताचे डाग नाहीत. मात्र, हाडे तुटलेल्या अवस्थेत सापडली आहेत.