लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. बापाच्या नात्याला कलंक लागणारी घटना घडलेय. ५० वर्षी पित्याने आपल्याच दोन मुलींना भक्ष्य केले. त्याने सलग १० वर्षे सातत्याने त्यांच्यावर रेप केला.
बाप-बेटी या पवित्र नात्याला कलंक लावण्याचे काम एका नराधाम बापाने केलाय. दोन्ही मुलींची त्याने इज्जत लुटली. अरविंद पांडे या ५० वर्षीय बापाने आपल्याच मुलींवर रेप केला. अरविंद हा शिक्षक असून तो प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक आहे.
हा प्रकार त्याच्या पत्नीला समजला. मात्र, बापाची भूक भागत नव्हती. त्याने दोन्ही मुलींची इज्जत लुटल्याने आई संतप्त झाली आणि तिने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी बापाविरोधात गुन्हा दाखल केलाय. दरम्यान, पिडित मुलींच्या आईने पोलिसात अनेकवेळा तक्रार केली. मात्र, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आईने केलाय.