कोलकाता, गुवाहाटी, पाटणा येथे भूकंपाचे धक्के

कोलकाता, गुवाहटी, पाटणा येथे भूकंपाचे धक्के जाणवल्याने अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. या भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमध्ये असून ७.० रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद करण्यात आलेय.

Updated: Apr 13, 2016, 09:12 PM IST
कोलकाता, गुवाहाटी, पाटणा येथे भूकंपाचे धक्के title=
छाया : ANI

नवी दिल्ली : कोलकाता, गुवाहटी, पाटणा येथे भूकंपाचे धक्के जाणवल्याने अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. या भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमध्ये असून ७.० रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद करण्यात आलेय.

भारतात ६.८ रिश्टर स्केल अशी नोंद झालेय. म्यानमारमध्ये मोठे हादरे बसलेत. लोकांनी घराबाहेर धाव घेतली. भारत-म्यानमार सीमा भागात १२५ किमी अंतरावर हे केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या ठिकाणी ७.१ रिश्टर स्केलची नोंद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

तर पाटणा येथे जोरदार भूकंपाचे धक्के जाणवलेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथेही भूकंप जाणवला.

  कोलकाता, गुवाहटी, पाटणा येथे भूकंपाचे धक्के जाणवलेत.