दोन लाखांत मिळत आहेत मर्सिडीज आणि बी एम् डब्ल्यू

चेन्नई : तुम्हाला मर्सिडीज, बी एम् डब्ल्यू किंवा ऑडी आवडते का?

Updated: Jan 22, 2016, 07:39 PM IST
दोन लाखांत मिळत आहेत मर्सिडीज आणि बी एम् डब्ल्यू title=

चेन्नई : तुम्हाला मर्सिडीज, बी एम् डब्ल्यू किंवा ऑडी आवडते का? पण इतकी महाग गाडी घेण्याइतपत पैसे नाहीयेत? तर मग तुम्ही चेन्नईला जा. कारण, तिथे या गाड्या अगदी स्वस्तात मिळतायत.

चेन्नईत डिसेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं होतं. यात रस्त्यांवर उभ्या असलेल्या गाड्या तर काही दिवस पुराच्या पाण्यात पू्र्ण बुडाल्या होत्या. त्यामुळे यातील अनेक गाड्या खराब झाल्या.

लोकांनी अशा गाड्या आता अगदी किरकोळ भावात विकायला सुरुवात केली आहे. मर्सिडीज, बी एम् डब्ल्यू आणि ऑडी सारख्या गाड्या तर केवळ २ ते ६ लाखांत मिळतायत. इतकंच काय, तर अगदी पोर्शे, जॅग्वार यांसारख्या अतिआलिशान गाड्याही अगदी स्वस्तात उपलब्ध आहेत.

जवळपास १०,००० पेक्षा जास्त गाड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. काही ठिकाणी तर गाड्यांची ऑनलाईनही बोली लावली जात आहे. गाडीच्या उत्पादनाचे साल, गाडीची ठेवण आणि गाडीचा प्रकार यावर गाडीची किंमत अवलंबून आहे.

या विकत घेतलेल्या गाड्या किती उपयुक्त आहेत आणि त्या किती काळ चालू शकतील याबद्दल मात्र ग्राहक साशंक आहेत.