जोरदार पावसामुळे चेन्नई देखील झाली 'तुंबापुरी'

 तामिळनाडूत काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे, चेन्नई शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. पुढील तीन दिवसात तामिळनाडूसह, पाँडेचरी, आणि आंध्रप्रदेशातील समुद्र किनाऱ्यावरही मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे.

Updated: Nov 16, 2015, 03:34 PM IST
जोरदार पावसामुळे चेन्नई देखील झाली 'तुंबापुरी' title=

चेन्नई :  तामिळनाडूत काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे, चेन्नई शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. पुढील तीन दिवसात तामिळनाडूसह, पाँडेचरी, आणि आंध्रप्रदेशातील समुद्र किनाऱ्यावरही मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे.

चेन्नईत जोरदार पावसामुळे पाणी साचलं, त्यामुळे चाकरमान्यांना कार्यालय गाठण्यात कसरत करावी लागली. दक्षिण चेन्नईतील मेलापोर, व्यसरपाडी, उत्तर चेन्नईतलं पेरांबूर येथेही पाणी साचलं होतं.

चेन्नई शहरात शनिवारपासून पाऊस सुरू आहे. नागापट्टणम जिल्ह्यातही मागील तीन दिवसांपासून प्रचंड पाऊस झाला आहे. यामुळे हजारो एकरवरील भात पिकाला याचा मोठा फटका बसला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.