फारुख अब्दुल्लांची मुक्ताफळे, तरुणांची दगडफेक त्यांच्या देशासाठी!

श्रीनगरमधील सभेत फुटीरवाद्यांना मदत करणारे वक्तव्य जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केले. दगड फेकणाऱ्यांचे पर्यटनासाठी देणंघेणं नाही, तरुणांची दगडफेक त्यांच्या स्वतंत्र देशासाठी आहे, असं म्हणत फारुख यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 5, 2017, 04:31 PM IST
फारुख अब्दुल्लांची मुक्ताफळे, तरुणांची दगडफेक त्यांच्या देशासाठी! title=

नवी दिल्ली : श्रीनगरमधील सभेत फुटीरवाद्यांना मदत करणारे वक्तव्य जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केले. दगड फेकणाऱ्यांचे पर्यटनासाठी देणंघेणं नाही, तरुणांची दगडफेक त्यांच्या स्वतंत्र देशासाठी आहे, असं म्हणत फारुख यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. 

जम्मू आणि काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक करणाऱ्यांची माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी भलामण केली आहे. दगडफेक करणाऱ्यांना पर्यटनाशी काही देणंघेणं नाही, ते त्यांच्या देशासाठी लढत असल्याचा जावईशोध अब्दुल्लांनी लावलाय. 

सध्या राजधानी श्रीनगरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार सुरू आहे. त्यासाठी झालेल्या प्रचारसभेत अब्दुल्लांनी अकलेचे तारे तोडलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरी युवकांना टेररिझमच्या जागी टुरिझम आणण्याचं आवाहन केलं होतं. त्याला अब्दुल्लांनी उत्तर दिलंय. 

भारत आणि पाकिस्तान काश्मीर प्रश्न सोडवत नसल्यानं त्यात अमेरिकेसारख्या तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. केंद्र सरकारनं कालच अमेरिकेचा मध्यस्थीचा प्रस्ताव स्पष्ट शब्दांत फेटाळलाय, हे विशेष.