महात्मा गांधी इंग्रजांचे एजंट होते - मार्कंडेय काटजू

राष्ट्रपिता महात्मा गांधी, हे ब्रिटीशांचे एजंट होते, असे धक्कादायक विधान सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केले आहे. त्यामुळे यावरुन मोठा काटजू यांनी ओढवून घेतलाय.

Updated: Mar 10, 2015, 05:08 PM IST
महात्मा गांधी इंग्रजांचे एजंट होते - मार्कंडेय काटजू  title=

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी, हे ब्रिटीशांचे एजंट होते, असे धक्कादायक विधान सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केले आहे. त्यामुळे यावरुन मोठा काटजू यांनी ओढवून घेतलाय.

मार्कंडेय काटजू यांना ब्लॉग लिहून महात्मा गांधींवर टीका केली आहे. महात्मा गांधी यांनी देशाचे मोठे नुकसान केले आहे. बापूंनी राजकारणाता धर्माला घुसवून फोडा आणि राज्य करा, हे ब्रिटीशांचे धोरण पुढे सुरू ठेवले, असे त्यांना आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलेय.

महात्मा गांधी यांनी आपल्या भाषणांत रामराज्य, ब्रह्मचार्य, गोमाता रक्षा यासारख्या हिंदुत्ववादी विचारांचा उल्लेख केलाय. तो करत असल्यामुळे मुस्लिम लीग सारख्या संघटनांकडे जास्तीत जास्त मुस्लिम नागरिक आकर्षित झाले, असा शोधही काटजू यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लावला आहे.

गांधीजी यांनी क्रांतिकारी आंदोलनाला सत्याग्रही आंदोलनाकडे नेत ब्रिटीश राजवटीला लाभ करून दिला. गांधींचींचे आर्थिक विचारही ढोंगीपणाचे होते, असा थेट हल्लाबोल ब्लॉगमधून करत महात्मा गांधी यांच्या सत्याग्रह आंदोलनालाही काटजू यांनी लक्ष्य केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.