आठवीच्या मुलांकडून सहावीतल्या मुलीवर बलात्कार

Last Updated: Wednesday, April 23, 2014 - 15:40

www.24taas.com, झी मीडिया, झारखंड
झारखंडच्या लोहरदगामध्ये मानवतेल काळीमा फासणारी घटना घडली आहे. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या काही मुलांनी सहावीत शिकणाऱ्या मुलीवर शाळेच्या परिसरातच बलात्कार केलाय.
आरोपींनी या मुलीला रात्री फूस लावून शाळा परिसरात नेलं आणि बलात्कार केला ही घटना शनिवारी रात्री घडली, यानंतर मंगळवारी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडीत मुलीने तसेच तिच्या आईने आणि भावाने पोलिस स्टेशनला जाऊन या भयानक घटनेची माहिती दिली.
ही अल्पवयीन मुलगी शाळेच्या क्लर्ककडे घरकाम करायची आणि तिथेच अभ्यासही करत होती.
या मुलीसोबत आठवीच्या एका मुलांनी तिला शाळेच्या परिसरात नेलं आणि बलात्कार केला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 23, 2014 - 15:40
comments powered by Disqus