'माझ्यावर होणाऱ्या बलात्काराचं चित्रीकरण कर', पीडित मुलीची मित्राला विनंती

लखनऊ : उत्तर प्रदेशातील जलायून येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Updated: Mar 21, 2016, 11:17 AM IST
'माझ्यावर होणाऱ्या बलात्काराचं चित्रीकरण कर', पीडित मुलीची मित्राला विनंती title=

लखनऊ : उत्तर प्रदेशातील जलायून येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या शहरात राहणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणीने आपल्या एका मित्राला तिच्या वडिलांकडून होणाऱ्या बलात्काराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची विनंती केल्याची घटना समोर आली आहे. 

मुलीच्या म्हणण्याप्रमाणे तिचे वडील गेली चार वर्ष तिचे लैंगिक शोषण करत होते. तिने यासंबंधीची माहिती तिच्या आईला दिली, पण तिच्या आईने मात्र तिच्या या तक्रारीवर विश्वास ठेवण्यास नकार दिला. शेवटी कंटाळलेल्या या तरुणीने तिच्या एका मित्राला पुरावा म्हणून तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराचे चित्रण करण्यास सांगितले. 

'माझ्या बापाला सर्वात कठीण अशी शिक्षा दिली जावी. ते फक्त मरुन चालणार नाही तर त्यांना अतिशय वेदनादायी मरण आले पाहिजे. त्यांना लोकांच्या पुढ्यात फाशी दिली जावी, त्यांना लोकांनी मारलं पाहिजे, तेव्हाच त्यांना त्यांनी केलेल्या कृत्यांची जाणीव होईल,' अशी प्रतिक्रिया या मुलीने एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. 

दरम्यान पोलिसांनी तिच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. तिच्या वडिलांनी गुन्हा कबूल केल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.