सोन्याच्या किंमतीत घट, किंमतीत घसरण सुरूच

परदेशी चलनामध्ये झालेली घट यामुळे सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे सोन्याची किंमत १० ग्रॅमसाठी २६,०००च्या खाली आली आहे.

Updated: May 18, 2013, 10:02 AM IST

www.24taas.com, झी, मीडिया, नवी दिल्ली
परदेशी चलनामध्ये झालेली घट यामुळे सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे सोन्याची किंमत १० ग्रॅमसाठी २६,०००च्या खाली आली आहे. सोन्याच्या दरात झालेली घसरण यामुळे सोन्याची किंमत ही २५,९७५ इतकी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोन्याच्या खरेदीत वाढ झालेली आहे.
सोन्याची किंमत ऑगस्टमध्ये २६,०८१ इतकी असताना १,७२१ लॉटचा व्यवसाय झाला होता. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किमंतीत घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक मंदी असल्यामुळे आहे.
एका तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. अनेकांनी शेअर बाजारात गुंतवणूक करीत आहेत. रूपयाच्या तुलनने डॉलर मजबूत असल्याने सोन्याच्या मागणीत घट होत असल्याचे मानले जात आहे. जागतिक तुलननेवर लंडनमध्ये सोन्यांच्या किंमतीतस ०.७ टक्के घसरण झाली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.