सोनं-चांदी खरेदीचा विचार करताय तर...

तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे... 

Updated: Jul 28, 2014, 11:33 AM IST
सोनं-चांदी खरेदीचा विचार करताय तर...  title=
फाईल फोटो

मुंबई : तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे... 

सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी सध्याचे दिवस शुभ आहेत असंच संजा कारण, सोन्या-चांदीच्या किंमतीत घट होण्याचा एक ट्रेन्डच सध्या दिसतोय. वैश्विक पातळीवर स्टॉकिस्टच्या दराऱ्यामुळे सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत ही घट दिसून येतेय. 

गेल्या आठवडयाच्या अखेरीस स्टॉकिस्टांनी केलेल्या ताबडतोब लिलामुळे सुरुवातील झालेली घट थोडी कमी प्रमाणात झाली. जुलैच्या अखेरीस सोन्याची किंमत 27,938 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदविण्यात आली होती. तर चांदीची किंमत 43,821 रुपये प्रति किलो होती. 

बाजार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टॉकिस्टांमुळे तसंच डॉलरची स्थिती मजबूत झाल्यामुळे या बहुमूल्य धातुंच्या मागणीत घट झालीय. 

न्यूयॉर्कमध्ये गेल्या आठवड्यात सोन्यात 0.4 टक्क्यांची घट नोंदविण्यात आलीय. गुंतवणूकदारांच्या सराफा बाजारातून गुंतवणूक काढून शेअर बाजारात लावलाय. याचाही बाजाराच्या धारणेवर परिणाम दिसून आलाय.  

भारतात सध्या सोन्याची किंमत 27,724 प्रति दहा ग्रॅम तर चांदी 43821 रुपये प्रति किलो आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.