हरिद्वारमध्ये बाबा रामदेव यांच्या आश्रमात गोळीबार

योगगुरू बाबा रामदेव यांच्या आश्रमामध्ये आज सुरक्षारक्षक आणि ट्रक संघनेमधील वादातून गोळीबार झाला. या घटनेत एक ठार झाल्याचं सांगण्यात येतंय. यावेळी सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबारात दलजित नावाची व्यक्ती ठार झाली आहे. 

Updated: May 27, 2015, 07:45 PM IST
हरिद्वारमध्ये बाबा रामदेव यांच्या आश्रमात गोळीबार title=

हरिद्वार : योगगुरू बाबा रामदेव यांच्या आश्रमामध्ये आज सुरक्षारक्षक आणि ट्रक संघनेमधील वादातून गोळीबार झाला. या घटनेत एक ठार झाल्याचं सांगण्यात येतंय. यावेळी सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबारात दलजित नावाची व्यक्ती ठार झाली आहे. 

दरम्यान, घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. पोलिसांनी बाबा रामदेव यांचा भाऊ रामभरत आणि एका सुरक्षारक्षकाला ताब्यात घेतले आहे. शिवाय, आश्रमातून चार बंदूक जप्त केल्या आहेत. 

रामदेवबाबा यांच्या पतंजली फूड पार्कमध्ये ही घटना घडली. सुरक्षारक्षक आणि ट्रक संघटनेमध्ये जोरदार धुमचक्री झाली. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.