फक्त होळी, दिवाळीला आंघोळ करणाऱ्या पती विरोधात तक्रार

उत्तर प्रदेशातील एका महिलेने आपला पती फक्त होळी आणि दिवाळीला अंघोळ करतो, असं सांगून पोलिसात तक्रार केली आहे. महिना-महिना आपला पती आंघोळ करत नसल्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे, असे या महिलेने एसपी रवी शंकर यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

Updated: Mar 31, 2016, 05:13 PM IST
फक्त होळी, दिवाळीला आंघोळ करणाऱ्या पती विरोधात तक्रार title=

बाघपथ : उत्तर प्रदेशातील एका महिलेने आपला पती फक्त होळी आणि दिवाळीला अंघोळ करतो, असं सांगून पोलिसात तक्रार केली आहे. महिना-महिना आपला पती आंघोळ करत नसल्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे, असे या महिलेने एसपी रवी शंकर यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

नवऱ्याच्या कुटुंबाने मागच्यावर्षी दिवाळीत त्यानंतर पाच महिन्यांनी होळीमध्ये आंघोळ केली, असे या महिलेने म्हटले आहे. एसपी शंकर यांनी ही तक्रार महिला शाखेकडे पाठवली आहे. जेणेकरुन लवकरात लवकर या प्रकरणावर काहीतरी तोडगा निघेल.

जेव्हा या महिलेने कुटुंबियांना स्वच्छता ठेवण्यास सांगितले. तेव्हा कुटुंबाने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि तिला नको तिथे लक्ष घालू नकोस असे सुनावले.