हरियाणात पूरस्थिती, अनेक रस्ते पाण्याखाली

दिल्ली-जयपूर महामार्गावर आज अभूतपूर्व वाहतूक कोंडी झालीय. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानं हरियाणातल्या गुरुग्राममध्ये रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी तर नागरीक १४ ते १५ तासांपासून अडकून पडले.

ANI | Updated: Jul 29, 2016, 07:45 PM IST
हरियाणात पूरस्थिती, अनेक रस्ते पाण्याखाली  title=

नवी दिल्ली : दिल्ली-जयपूर महामार्गावर आज अभूतपूर्व वाहतूक कोंडी झालीय. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानं हरियाणातल्या गुरुग्राममध्ये रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी तर नागरीक १४ ते १५ तासांपासून अडकून पडले.

मुसळधार पावसानं बादशाहपूर नाला तुटल्याने रस्त्यांवर काही फूट पाणी साचले आहे. त्याचा परिणाम दिल्ली-जयपूर महामार्गावरील वाहतुकीवर झाला आहे. बस, ट्रक या अवजड वाहनांसह कार आणि दुसरी हलकी वाहनं रस्त्यावर अडकलीये. संततधार पावसानं गुरुग्राम परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अजूनही अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे.