राहुल गांधी कसे दिसतात? पोलिसांना ठाऊक नाही!

 काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी कसे दिसतात हे जर भारतात कुणाला विचारलं तर कुणीही सहज त्यांना ओळखू शकेल... पण, भारतातील हे नावाजलेलं व्यक्तीमत्त्व कसं दिसतं हे दिल्ली पोलिसांना मात्र ठाऊक नाही.

Updated: Mar 14, 2015, 03:38 PM IST
राहुल गांधी कसे दिसतात? पोलिसांना ठाऊक नाही! title=

नवी दिल्ली :  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी कसे दिसतात हे जर भारतात कुणाला विचारलं तर कुणीही सहज त्यांना ओळखू शकेल... पण, भारतातील हे नावाजलेलं व्यक्तीमत्त्व कसं दिसतं हे दिल्ली पोलिसांना मात्र ठाऊक नाही.

त्याचं झालं असं की, दिल्ली पोलिसांची एक टीम काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या कार्यालयात गेली होती. ते कशासाठी आलेत याचं कोणतंही कारण न देता थेट राहुल गांधी कसे दिसतात? त्यांचा रंग कसा आहे? केस कसे आहेत? यांसारखे अनेक प्रश्न विचारण्यास त्यांनी सुरूवात केली. यासर्व प्रकाराने कार्यालयात उपस्थित चकीत झाले.

काँग्रेसने यासर्व प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राहुल गांधी खासदार आहेत, त्यामुळे त्यांची सर्व माहिती फोटोसहीत इंटरनेटवर उपलब्ध असताना कार्यालयात येऊन चौकशी करण्याची गरज काय होती, असा संतप्त सवाल काँग्रेसने दिल्ली पोलीस आयुक्तांना विचारला आहे. पोलीस नक्की कशाला आले होते हे अजूनदेखील स्पष्ट झालेलं नाही.