मृत दहशतवाद्यांकडे ड्रायफ्रूट, ग्रेनेड, दुर्बिण, मेडीकल कीट आणि...

काश्मीरमध्ये काल चार ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. काश्मीर हादरलं. हल्लेखोर सर्व दहशतवादी ठार झाले असले तरी त्यांच्याकडे मिळालेल्या सामानाची यादी पाहिली तर त्यांचे पाठिराखे कोण होते हे आपल्या लक्षात येईल...

Updated: Dec 6, 2014, 09:24 PM IST
मृत दहशतवाद्यांकडे ड्रायफ्रूट, ग्रेनेड, दुर्बिण, मेडीकल कीट आणि... title=

नवी दिल्ली : काश्मीरमध्ये काल चार ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. काश्मीर हादरलं. हल्लेखोर सर्व दहशतवादी ठार झाले असले तरी त्यांच्याकडे मिळालेल्या सामानाची यादी पाहिली तर त्यांचे पाठिराखे कोण होते हे आपल्या लक्षात येईल. सीमेपलीकडून येणाऱ्या या दहशतवाद्यांकडे खजूर, ड्रायफ्रूट्स मिळाली आहेत. विशेष म्हणजे, हे सामान पाकिस्तानात पॅक झालंय. याचाच अर्थ अनेक दिवस लढण्याच्या तयारीत दहशतवाही होते. तसंच त्यांचं पोषण पाकिस्तानच्याच पाठिंब्यावर होत होतं हेही निश्चित होतंय.

जम्मू काश्मिरमध्ये १४ तासांत ४ ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्यात आला. श्रीनगरपासून १०० किलोमीटरवर असलेल्या मोहारा आर्मी कँप, ऊरी, बारामुल्ला इथे दहशतवादी आणि सैन्यदलात जोरदार चकमक झाली. यात हल्लेखोर सर्व दहशतवादी ठार झाले. या कारवाईत आर्मीलाही जीवित आणि वित्तहानीला सामोरं जावं लागलं. मात्र एकही दहशतवादी वाचला नाही. ११ तास चकमक झाली. यात दहशतवाद्यांकडून ६ एके ४७, ३२ ग्रेनेड, ५५ मॅगझीन, २ शॉटगन, २ दूर्बिणी, ४ रेडिओ सेट आणि १ मेडिकल कीट मिळालं.
 
या हत्यारांव्यतिरिक्त जे सामान दहशतवाद्यांकडून मिळालं ते मोठ्या कटावर प्रकाशझोत टाकतंय. दहशतवाद्यांकडे ड्रायफ्रूटची पॅकेट्स, अनेक दिवसांचं जेवण, भारतीय चलन तसंच तत्सम गोष्टी होत्या ज्यांच्यासह ते हा हल्ला अनेक दिवस सुरू ठेऊ शकतील. जी फूड पॅकेट्स हस्तगत झाली आहेत. त्यावर जेवण गरम कशा पद्धतीने करावं याच्या सूचना लिहिल्या आहेत. विशेष म्हणजे अशी पॅकेट्स एखाद्या लष्कराला दिली जातात. पॅकेट्सवरील सर्व सूचना उर्दूमध्ये आहेत. 
 
या गोष्टी पाहिल्यावर आता पाकिस्तानची या हल्ल्यांना कशी साथ होती आणि काश्मीरमधली निवडणूक प्रक्रिया बाधीत करण्याचा पाकिस्तानचा कसा डाव होता, हेच स्पष्ट होतंय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.