आयआयटीच्या विद्यार्थ्यांना फेसबूककडून मिळाले १.५५ कोटींचे पॅकेज

फेसबूक या काळात भारतीयांसाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर सिद्ध होत आहे. सोशल नेटवर्किंग साइट फेसबूकने आयआयटी खडगपूरच्या विद्यार्थ्यांना १.५५ कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. 

Updated: Dec 2, 2014, 05:18 PM IST
 आयआयटीच्या विद्यार्थ्यांना फेसबूककडून मिळाले १.५५ कोटींचे पॅकेज title=

नवी दिल्ली : फेसबूक या काळात भारतीयांसाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर सिद्ध होत आहे. सोशल नेटवर्किंग साइट फेसबूकने आयआयटी खडगपूरच्या विद्यार्थ्यांना १.५५ कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. 
देशभरातील कॉलेजमध्ये १५ ते २० टक्के अधिक नोकऱ्या आणि सरासरी सॅलरी १०-२० टक्के वाढ आणि ३० टक्के जास्त ग्लोबल ऑफरसह यंदा आयआयटीचा प्लेसमेंट सुपर हीट ठरले आहे

प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशी फेसबूकने आयआयटी खडगपूर येथील एका विद्यार्थ्याला साइन केले. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आयआयटीतील सर्वात चांगले पॅकेज मानले जात आहे.  

प्लेसमेंट कमेटीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयआयटीमध्ये हायरिंग आणि सॅलरीच्या बाबतीत पाहिले तर या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक उदासिनता आहे. ‘द इकॉनामिक टाइम्समध्य प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार फेसबूकने आयआयटी खडगपूरच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रोफाइलचे ३ स्टुटंडट कॅलिफोर्नियामध्ये निवडले गेले.

या विद्यार्थ्यांना १.५५ कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले आहे. इतके नाही तर आयआयटी दिल्लीच्या प्लेसमंट कमेटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी दिल्ली आयआयटीत यंदा ९३ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. यावेळी प्लेसमेंटमध्ये आयटी, टेलिकॉम आणि सोशल मीडिया कंपन्यांनी सहभाग घेतला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.