दिल्लीत दोन चिमुरडींवर सामूहिक बलात्कार

 दिल्ली पुन्हा हादरली आहे. दोन बालिकांवर बलात्कार करण्याच्या घटना घडल्यात. राजधानी दिल्लीत २ वर्षांच्या चिमुरडीचे रामलीला कार्यक्रमादरम्यान अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडलेय. तर दुसरीकडे बर्थ डे पार्टीसाठी तरूणीवर सहा जणांनी बलात्कार केला. 

PTI | Updated: Oct 17, 2015, 01:12 PM IST
दिल्लीत दोन चिमुरडींवर सामूहिक बलात्कार title=

नवी दिल्ली :  दिल्ली पुन्हा हादरली आहे. दोन बालिकांवर बलात्कार करण्याच्या घटना घडल्यात. राजधानी दिल्लीत २ वर्षांच्या चिमुरडीचे रामलीला कार्यक्रमादरम्यान अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडलेय. तर दुसरीकडे बर्थ डे पार्टीसाठी तरूणीवर सहा जणांनी बलात्कार केला. 

राजधानी दिल्लीत रामलीला येथे एक कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमाच्यावेळी दोन वर्षांच्या बालिकेच अपहरण करण्यात आले. या बालिकेवर त्यानंतर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पीडित बालिकेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. आणखी एका अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आलाय. या दोन्ही बालिसांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे.

दुसऱ्या एका घटनेत मित्राच्या बर्थ डे पार्टीसाठी गेलेल्या २० वर्षीय तरूणीवर तिच्या मित्रासह सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना गुडगाव येथे उघडकीस आली. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केलेय.

मुळची पश्चिम बंगालमधील असलेली पीडित तरूणी तिच्या मैत्रिणीसह डिएलएफ सिटीमधील एका विश्रामगृहात बर्थ डे पार्टी साजरी करण्यासाठी गेली होती. पाच तरूण तेथे आधीपासून होते. यासर्वांनी मद्यप्राशन करून तरूणीसह तिच्या मैत्रिणीला मारहाण केली. त्यानंतर मित्रासह सहा जणांनी तरूणीवर सामूहिक बलात्कार केला.

दरम्यान, पीडित तरूणीच्या मैत्रिणीने नराधमांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.