भारतीय सैनिकांनी POKतील दहशतवाद्यांचे 7 तळ केले उद्धवस्त

काल रात्री सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतावादी कारवाया रोखण्यासाठी पाकला जोरदार झटका दिला आहे. लाईन ऑफ कंट्रोलच्या पलिकडे असणारे सात दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत. 

Updated: Sep 29, 2016, 02:02 PM IST
भारतीय सैनिकांनी POKतील दहशतवाद्यांचे 7 तळ केले उद्धवस्त title=

नवी दिल्ली : काल रात्री सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतावादी कारवाया रोखण्यासाठी पाकला जोरदार झटका दिला आहे. लाईन ऑफ कंट्रोलच्या पलिकडे असणारे सात दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत. 

काल दहशतवाद्यांच्या काही टोळ्या भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत होत्या.. यावेळी लष्करानं नियंत्रण रेषेपलिकडे दोन किलोमीटर आज जाऊन दहशतवाद्यांचे पाच तळ उधळून लावले. त्यासाठी हेलिकॉप्टरनं सैनिकाना पाकिस्तान नियंत्रित भागात उतरवण्यात आलं. 

या सैनिकांनी दहशतवादी तळांवर हल्ले चढवून पहाटे सहा वाजता ऑपरेशन यशस्वी केलं.  रात्री साडे बारा ते सहा या काळात करण्यात आलेल्या या कारवाईची माहिती आज सकाळी कॅबिनेटच्या सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर जाहीर करण्या आली.यापुढे असे हल्ले करण्याचा इरादा नाही. पण पाकनं दहशतवाद्यांना पाठिंबा देणं थांबललं नाही तर, अशा कारवाया कराव्या लागतील असं लष्करी कारवाईचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी यावेळी स्पष्ट केलंय. त्याआधी

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेलेले असताना सध्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची बैठक झाली. या बैठकीला राजनाथ सिंह, मनोहर पर्रिकर, अरूण जेटली, लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह सुहाग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल उपस्थित होते.