इराकमध्ये अडकलेल्या सर्व नर्सेस कोच्चीत दाखल

 इराकमध्ये अडकलेल्या सर्व नर्सेस मायदेशी परतल्या आहेत. ४६ नर्सेस कोच्चीला दाखल झाल्या आहेत. इराकहून परतलेल्या या नर्सेसचं कोच्ची विमानतळावर स्वागत करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांसह शेकडो नागरिक जमलेले होते.

Updated: Jul 5, 2014, 01:42 PM IST
इराकमध्ये अडकलेल्या सर्व नर्सेस कोच्चीत दाखल title=

कोच्ची : इराकमध्ये अडकलेल्या सर्व नर्सेस मायदेशी परतल्या आहेत. ४६ नर्सेस कोच्चीला दाखल झाल्या आहेत. इराकहून परतलेल्या या नर्सेसचं कोच्ची विमानतळावर स्वागत करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांसह शेकडो नागरिक जमलेले होते.

आपल्या नातेवाईकांना पाहून या नर्सेसना अश्रू अनावर झाले. गेल्या कित्तेक दिवसांपासून या नर्सेसच्या सुटकेसाठी भारत सरकार मोठ्या कसोशीनं प्रयत्न करत होतं. आज सकाळी एअर इंडियाच्या विशेष विमानानं या नर्सेसना मुंबईत आणण्यात आलं.

इराकमध्ये सुन्नी दहशतवादी संघटना ISISच्या ताब्यातून ४६ भारतीय नर्सची सुखरुपपणे सुटका करण्यात आली आहे. ४६ नर्स आणि १३७ जणांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने आज सकाळी ९.३० वाजता मुंबईत आणले गेले. 

दरम्यान, दहशतवादी संघनेने बिनाशर्त भारतीयांना सोडल्याचे सांगण्यात येत आहे. इराकमध्ये सुन्नी दहशतवादी संघटना ISISच्या ताब्यातून ४६ भारतीय नर्सची सुखरुपपणे सुटका करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.