कर्नाटक निवडणूक : बेळगावमध्ये हाणामारी

बेळगावात दोन मराठी उमेदवारांत हाणामारी झालीये. बेळगावच्या दक्षिण मतदारसंघात ही हाणामारी झालीय. यात महाराष्ट्र एकिकरण समितीच्या संभाजी पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून भाजपचे अभय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 5, 2013, 12:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
बेळगावात दोन मराठी उमेदवारांत हाणामारी झालीये. बेळगावच्या दक्षिण मतदारसंघात ही हाणामारी झालीय.
यात महाराष्ट्र एकिकरण समितीच्या संभाजी पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून भाजपचे अभय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सकाळपर्यंत शाततेत सुरू असलेल्या बेळगावातल्या मतदानावर या हाणामारीमुळे गालबोट लागलंय.
बेळगाव हा कर्नाटकातला सर्वात मोठा जिल्हा असून या जिल्ह्यात १८ मतदार संघ आहेत. या पैका पाच मतदार संघात मराठी मतदारांची संख्या निर्णायक आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने अठरापैकी पाच मराठी बहुल मतदार संघात आपले उमेदवार उभे केलेत. एकीकरण समिती यंदा एकत्र निवडणूक लढवत असल्यामुळे राज्यातील प्रमुख पक्षांसमोर एकीकरण समितीने कडवं आव्हान उभं केलय. बेळगावमध्ये आज सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळपासून कर्नाटकात मतदानास सुरुवात झालीय. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. जवळपास दीड लाख सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेत.. तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर जादा सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आलीय.
एकूण २२3 जागांसाठी हे मतदान होत असून ३००० उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला मतदारराजा व्होटिंग मशिनमध्ये बंदीस्त करणार आहे. कर्नाटक जनता पार्टीचे बी.एस.येडियुरप्पा यांनी आज. सकाळी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत येडियुराप्पांचा पक्ष पहिल्यांदाच मतदारांच्या सामोरे जाणार आहे. त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी ही निवडणूक महत्तवाची आहे. दरम्यान ८ मे रोजी मतमोजणी होणार आहे.