'किस ऑफ लव्ह'फेम राहुल-रश्मीचा 'सेक्स रॅकेट' प्रकरणाशी नेमका संबंध काय?

'किस ऑफ लव्ह'फेम राहुल पशुपालन आणि त्याची पत्नी रश्मी नायर या जोडप्याला केरळ पोलिसांनी अटक केलीय. एका टऑनलाईन सेक्स रॅकेट' प्रकरणात या जोडप्याचाही सहभाग असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

Updated: Nov 18, 2015, 07:11 PM IST
'किस ऑफ लव्ह'फेम राहुल-रश्मीचा 'सेक्स रॅकेट' प्रकरणाशी नेमका संबंध काय? title=

तिरुअनंतपुरम : 'किस ऑफ लव्ह'फेम राहुल पशुपालन आणि त्याची पत्नी रश्मी नायर या जोडप्याला केरळ पोलिसांनी अटक केलीय. एका 'ऑनलाईन सेक्स रॅकेट' प्रकरणात या जोडप्याचाही सहभाग असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

मंगळवारी पोलिसांनी घातलेल्या धाडीनंतर या जोडप्याला अटक करण्यात आलीय. या दोघांनी काही शालेय मुलींचे अश्लील फोटो फेसबुकवर अपलोड केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. सायबर पोलिसांनी अधिक माहिती मिळवली असता, हे एक संपूर्ण ऑनलाईन सेक्स रॅकेट असल्याचं समोर आल्याचं पोलिसांनी म्हटलंय. 

एका अनैतिक कृत्य करणाऱ्या टोळीला लहान पुरवण्याच्या कामात मदत केल्याचा आरोप राहुल - रश्मी यांच्यावर सध्या ठेवण्यात आलाय. या रॅकेटमध्ये त्यांचा नेमका कसा सहभाग होता, याबद्दल मात्र अद्याप चौकशी सुरू आहे. 


'किस ऑफ लव्ह'

राहुल आणि रश्मी काही दिवसांपूर्वी 'मॉरल पोलिसिंग'विरोधात उभ्या केलेल्या कॅम्पेनमुळे अचानक प्रकाशझोतात आले होते. कोझिकोडे इथं एका कॉफी शॉपमध्ये घुसून काही लोकांनी अनैतिक कृत्य करणाऱ्या तरुण-तरुणींना मारहाण केली होती. याविरुद्ध राहुल - रश्मी यांनी 'किस ऑफ लव्ह' आंदोलन सुरू केलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.