पर्रीकरांच्या राजीनाम्यानंतर पार्सेकरांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

पणजी : मनोहर पर्रिकर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्याजागी लक्ष्मीकांत पारसेकर यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. हा शपथविधी राजभवनावर पार पडला. 

PTI | Updated: Nov 8, 2014, 05:06 PM IST
पर्रीकरांच्या राजीनाम्यानंतर पार्सेकरांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ title=

पणजी : मनोहर पर्रिकर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्याजागी लक्ष्मीकांत पारसेकर यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. हा शपथविधी राजभवनावर पार पडला. 

केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी मनोहर पर्रिकर यांनी आज गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावरून राजीनामा सोपवल. त्यानंतर, आज सकाळी विधीमंडळ पक्षाची एक बैठक पार पडली. या बैठकीत गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावर चर्चा झाली. त्यानंतर लक्ष्मीकांत पारसेकर यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलं. 

सध्या, गोव्याच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री म्हणून कार्यरत असणाऱ्या पारसेकरांचं नाव मावळते मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांनी मांडलं आणि त्या नावाला उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा यांनी अनुमोदन दिलं. पारसेकर सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत तसंच त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचे संबंध आहेत.    

पायउतार झालेल्या मनोहर पर्रिकरांनी केंद्रात संरक्षण खात्याची जबाबदारी सोपविण्याची चिन्हं आहेत. पर्रिकर यांनी आर्चबिशपची बेट घेतल्यानंतर आज दुपारी राजभवनात राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. पर्रिकर यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील मंत्रिमंडळही भंग झालंय. यामध्ये १२ मंत्र्यांचा समावेश होता. यातील दोन महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीचे नेते आहेत. नव्या मुख्यमंत्र्यांसोबत नवीन मंत्रिमंडळ शपथ घेणार आहे.  


 

पार्सेकर यांची निवड

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज शनिवारीआपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. गोव्याचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी पार्सेकर यांचे मुख्यमंत्रिपदी त्यांचे नाव घोषित केले. 

मनोहर पर्रिकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा फॅक्सद्वारे राज्यपालांकेडे सोपवला. गोव्याचे नाराज उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे. पक्ष जी जाबबदारी देईल ती स्वीकारणार असं मत आता त्यांनी व्यक्त केलंय. 

तर गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्याबाबत झालेल्या भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीत गोव्याचे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती भाजप महासचिव जे.पी. नड्डा यांनी सांगितले. त्यानुसार त्यांच्या नावाची घोषणा कऱण्यात  आली आहे.

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत लक्ष घालण्यासाठी पक्षाने राजीवप्रताप रुडी, बी. एस. येडियुरप्पा आणि बी. सतीश या नेत्यांची नियुक्ती केली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.