आता, घरच्या गॅस सिलिंडरचे पैसेही ऑनलाईन भरा!

तुम्हीही घरी एलपीजी सिलिंडर वापरत असाल तर तुमच्या एक खुशखबर आहे. आता तुम्हाला घरी गॅस सिलिंडर आल्यावर डिलिव्हरी बॉयकडे पैसे द्यावे लागणार नाहीत... कारण, देशात पहिल्यांदाच गॅस सिलिंडरचे पैसे ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध होतेय. 

Updated: Nov 28, 2015, 02:10 PM IST
आता, घरच्या गॅस सिलिंडरचे पैसेही ऑनलाईन भरा! title=

नवी दिल्ली : तुम्हीही घरी एलपीजी सिलिंडर वापरत असाल तर तुमच्या एक खुशखबर आहे. आता तुम्हाला घरी गॅस सिलिंडर आल्यावर डिलिव्हरी बॉयकडे पैसे द्यावे लागणार नाहीत... कारण, देशात पहिल्यांदाच गॅस सिलिंडरचे पैसे ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध होतेय. 

गॅस सिलिंडरच्या बुकिंगसाठी नागरिकांना एक 'स्मार्ट कार्ड'चीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेवर लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. येत्या दोन महिन्यांत ही योजना सुरू होण्याची चिन्ह आहेत. 

इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध होऊ शकेल. यामुळे, ग्राहक सोप्या पद्धतीनं गॅस बुकिंग आणि त्याचं पेमेंट करू शकतील. 

कसं कराल ऑनलाईन पेमेंट
ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी ग्राहकांना mylpg.in वर एक नवीन अकाऊंट तयार करावं लागेल. बुकिंग आणि पेमेंट केल्यानंतर वेबसाईटवर ग्राहकांना एक वाऊचर मिळेल... याशिवाय, रजिस्टर्ड केलेल्या मोबाईल नंबरवर एक मॅसेजही पाठवण्यात येईल. सबसिडीचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना अगोदरच्याच बाजारदरानुसार पैसे मोजावे लागतील.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.