पंतप्रधान मोदींची कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर दिली आहे. पंतप्रधानांनी  कर्मचा-यांच्या बोनसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांचा किमान बोनस साडेतीन हजारांवरून सात हजार करण्यात आलाय.

Updated: Nov 27, 2015, 09:20 PM IST
पंतप्रधान मोदींची कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर   title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर दिली आहे. पंतप्रधानांनी  कर्मचा-यांच्या बोनसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांचा किमान बोनस साडेतीन हजारांवरून सात हजार करण्यात आलाय.

बोनससाठी मूळ वेतनाची मर्यादाही 10 हजारांवरून 21 हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. बोनस कायद्यात सुधारणा करण्यासाठी कॅबिनेटनं मंजुरी दिली असून ते लकरच संसदेत मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी लोकसभेत दिली.

राज्यातही भाजपचं सरकार आहे. त्यामुळे आता राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्येही वाढ होणार का असा प्रश्न राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना पडला असेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.