शिवसेनेचा तडका, महाराष्ट्र भवनात मारा रस्यावर भुर्र...sssका

महाराष्ट्र सदनात आता अस्सल मराठी जेवण मिळायला सुरूवात झाली आहे. कोल्हापुरी चिकन आणि रस्साही आता महाराष्ट्र भवनात मिळतोय, यामुळे आता खासदार आणि अभ्यागतांना भुर्रका मारता येणार.

Updated: Jul 29, 2014, 03:53 PM IST
शिवसेनेचा तडका, महाराष्ट्र भवनात मारा रस्यावर भुर्र...sssका title=

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदनात आता अस्सल मराठी जेवण मिळायला सुरूवात झाली आहे. कोल्हापुरी चिकन आणि रस्साही आता महाराष्ट्र भवनात मिळतोय, यामुळे आता खासदार आणि अभ्यागतांना भुर्रका मारता येणार.

दिल्लीत नवीन महाराष्ट्र भवनात जेवणाचा दर्जा खालवला होता, यावरून वादही झाला. या वादानंतर राज्याच्या काही खासदारांनी शिफारस केलेल्या 'महिला आर्थिक विकास महामंडळ' या बचतगटाला महाराष्ट्र सदनातील कॅण्टीन सुविधा सांभाळण्यास दिली आहे.

आता सदनात 'अस्सल' मराठमोळे जेवण मिळण्यास सुरूवात झाली आहे. प्रभा रावत या बचतगटाच्या प्रमुख असून त्यांच्या देखरेखीखाली बचतगटाचे १७ कर्मचारी महाराष्ट्र सदनातील जेवणाची सुविधा सांभाळत आहेत. 

बचतगटाने महाराष्ट्र सदनाचे कॅण्टीन सांभाळण्यास सुरुवात केली, मागील शुक्रवारपासून हे जेवण मिळण्यास सुरूवात झाली आहे. यावेळी मेन्यूत वरण-भात, शिराही मिळतोय.

कॅण्टीनमध्ये वावरणारे कर्मचारी आणि वेटर्स सर्व मराठी आहेत, आणि सदनात येणाऱया प्रत्येकाशी त्यांचा संवाद मराठीतूनच असतो. या बचतगटाची टीम सध्यातरी सदनाच्या मानाने कमी असल्याने नेमकेच मराठमोळे पदार्थ सुरू करण्यात आले आहेत. 

काही दिवसांनी मेन्यूत आणखी वाढ होणार आहे, बचतगटाच्या प्रमुख प्रभा रावत यांनी ही माहिती दिली आहे. रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार सदनात १०० रुपयांत शाकाहारी थाळी मिळत आहे, यामध्ये सुखी भाजी, रस्सा भाजी, वरण-भात, चपातीचा समावेश आहे.

तर मांसाहारी जेवणासाठी आणखी ५० रुपये खर्चून कोल्हापूरी पद्धतीने केलेले चिकन सध्या उपलब्ध करून देण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.