५००च्या नोटवरून गांधीजी गायब

स्टेट बँकेच्या एटीएममधून चक्क महात्मा गांधीजींचा फोटो नसलेल्या नोटा बाहेर आल्यात. 

Updated: Apr 30, 2017, 10:18 PM IST
५००च्या नोटवरून गांधीजी गायब title=

मोरेना : स्टेट बँकेच्या एटीएममधून चक्क महात्मा गांधीजींचा फोटो नसलेल्या नोटा बाहेर आल्यात. मध्य प्रदेशमधील मोरेना इथल्या एटीएममध्ये हा प्रकार समोर आलाय. या गावातील एक व्यक्ती पैसे काढण्यासाठी या एटीएमवर आली होती. ज्यावेळी या व्यक्तीने एटीएममधून पैसे काढले त्याला ५०० रुपयाच्या नोटा मिळाल्या पण या नोटा पाहून या व्यक्तीला आश्चर्याचा धक्का बसला.  

ज्या नोटा एटीएममधून त्याला मिळाल्या त्यापैकी चार नोटांवर फक्त नंबर होते. मात्र त्या नोटांवरुन गांधीजींचे फोटो गायब होते. एटीएममधून बाहेर आलेल्या ५०० च्या चार नोटांवरून चक्क गांधीजींचे फोटो नसल्याचंही पाहून आजूबाजूचे लोकही अचंबित झाले. या सगळ्या प्रकाराबाबत स्टेट बँकेकडे तक्रार करण्यात आलीय. एटीएममध्ये गांधीजींचा फोटो नसलेल्या नोटा कशा आल्या याचा बँकेकडून तपास घेण्यात येतोय.