ललित मोदींच्या जावयावर आली होती भाड्याच्या घरात राहण्याची वेळ...

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदींच्या पासपोर्टचा मुद्दा दिवसेंदिवस तापत चाललाय. ललित मोदी बऱ्याच काळापासून मीडियात चर्चिले गेले आहेत... पण, वादापासून किंवा चर्चेपासून त्यांचं कुटुंबीय मात्र दूरच राहिलंय.

Updated: Jun 27, 2015, 02:39 PM IST
ललित मोदींच्या जावयावर आली होती भाड्याच्या घरात राहण्याची वेळ... title=

नवी दिल्ली : आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदींच्या पासपोर्टचा मुद्दा दिवसेंदिवस तापत चाललाय. ललित मोदी बऱ्याच काळापासून मीडियात चर्चिले गेले आहेत... पण, वादापासून किंवा चर्चेपासून त्यांचं कुटुंबीय मात्र दूरच राहिलंय.

 

बुधवारी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ललित मोदींच्या इमिग्रेशन अर्जावर सही केल्याचं मान्य केलंय. सुषमा स्वराज यांच्यानंतर आता वसुंधरा राजेही ललित मोदी वादात अडकताना दिसताहेत. नेहमीच वादाच्या भोवऱ्याच सापडणाऱ्या ललित मोदींच्या वैयक्तिक आयुष्यातही बरेच वाद आहेत.

 

मोदींच्या सावत्र मुलीच्या लग्नाच्या वेळीही बराच कौटुंबिक वाद समोर आला होता. इतकंच नाही तर मोदींच्या मुलीशी लग्न केल्यानंतर त्यांच्या जावयाशी त्याच्या घरच्यांनी संबंध तोडले होते. त्यामुळे, मोदींच्या मुलीवर आणि जावयावर काही दिवस भाड्याच्या घरातही राहण्याची वेळ आली होती.

 

करीमा ही ललित मोदींची पत्नी मीनल यांची मुलगी आहे. मीनल यांच्या पहिला विवाह नायजेरियन उद्योगपती जॅक सागरानी याच्याशी झाला होता. करीमा ही मीनल - जॅक यांची मुलगी...

 

तर ललित मोदींचा जावई गौरव हा बर्मन डाबर उद्योग समुहाच्या अध्यक्ष विवेक बर्मन आणि मोनिका बर्मन यांचा मुलगा आहे. गौरव बर्मन आणि करीमा मोदी यांचं लग्न दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने होणार होतं पण, या दोघांनीही घरी पूर्वकल्पना न देताच लग्न केल्यानं गौरवच्या परिवाराने त्याच्याशी असलेले संबंध तोडले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.