नव्या वर्षात खासदारांना दुप्पट पगाराचं गिफ्ट?

पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन गोंधळ घालून देशाच्या तिजोरीला खड्डा पाडणाऱ्या खासदारांचे पगार नव्या वर्षात दुपटीनं वाढण्याची शक्यता आहे. संसदीय कार्यमंत्रालयानं खासदारांच्या मूळ वेतनात 100 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवलाय.  

Updated: Dec 24, 2015, 08:18 AM IST
नव्या वर्षात खासदारांना दुप्पट पगाराचं गिफ्ट? title=

नवी दिल्ली : पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन गोंधळ घालून देशाच्या तिजोरीला खड्डा पाडणाऱ्या खासदारांचे पगार नव्या वर्षात दुपटीनं वाढण्याची शक्यता आहे. संसदीय कार्यमंत्रालयानं खासदारांच्या मूळ वेतनात 100 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवलाय.  

त्याचप्रमाणे खासदारांना मिळणाऱ्या मतदारसंघ भत्त्यातही दुपटीची वाढ सुचवण्यात आलीय. शिवाय सचिवांच्या भत्त्त्यासाठी दिल्या जाणारी रक्कमही लवकरच दुप्पट होण्याची शक्यताय.  

हे प्रस्ताव सध्या अर्थमंत्रालयाच्या विचाराधीन आहेत. प्रस्ताव जसाच्या तसा मान्य झाला, तर खासदारांना मिळणारं सध्याचं एक लाखाचं वेतन थेट दोन लाख ८० हजारांच्या घरात जाऊन पोहचणार आहे. याशिवाय संसदीय कार्य मंत्रालयानं खासदारांना मिळणारी पेन्शन २० हजारावरून ३५ हजारावर नेण्याच्या संसदीय समितीच्या शिफारसीलाही मान्यता दिलीय.