मुलायम सिंग वाढदिवशी उत्तरप्रदेश सरकारकडून कोट्यवधींची उधळपट्टी

 समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांच्या वाढदिवशी उत्तरप्रदेश सरकारकडून कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात आली. या उधळपट्टीवर तालिबान, दाऊद, अतिरेक्यांनी पैसे दिल्याचं आझम खान यांचं उर्मठ उत्तर दिलं.

Updated: Nov 22, 2014, 03:12 PM IST
मुलायम सिंग वाढदिवशी उत्तरप्रदेश सरकारकडून कोट्यवधींची उधळपट्टी title=

लखनऊ :  समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांच्या वाढदिवशी उत्तरप्रदेश सरकारकडून कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात आली. या उधळपट्टीवर तालिबान, दाऊद, अतिरेक्यांनी पैसे दिल्याचं आझम खान यांचं उर्मठ उत्तर दिलं.

समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलामसिंग यादव आज पंच्याहत्तरी गाठली. समाजवादी मुलायमसिंहांचा शाही वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. 

या वाढदिवसासाठी सरकारंनं 2 कोटी रुपये तर रामपूर प्रशासनानं 30 लाख रुपये खर्च केलेत. नगरविकास खात्यानंही वाढदिवसावर वारेमाप खर्च केलाय. या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आझम खान यांच्यावर होती.

वाढदिवसाच्या पूर्वसंधेला खास लंडनहून व्हिंटेल बग्गी मागवण्यात आली होती. या बग्गीतून समाजवादी मुलायम सिंहांची शाही मिरवणूकही काढण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूल शाळकरी मुलांनी नेताजींवर पुष्पांचा वर्षाव केला. 

75 व्या वाढदिवसानिमित्त खास 75 फूट लांबीचा केकही मागवण्यात आलाय. यासर्व खर्चाबाबत आझम खान यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पत्रकरांन उद्धटपणे उत्तरं दिली. या उधळपट्टीवर तालिबान, दाऊद, अतिरेक्यांनी पैसे दिल्याचं आझम खान यांचं उर्मठ उत्तर दिलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.