मुंबई-अहमदाबाद प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी पहिला गिअर

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची उदघाटन एक्सप्रेस जोरात दिसत आहे. पुण्याच्या मेट्रोला मागे टाकत नागपूर मेट्रो सुसाट आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात नागपूर मेट्रोला मंजुरी दिली. उद्या मोदींच्या हस्ते नागपूर मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. तर मुंबई-अहमदाबाद या देशातल्या पहिल्या प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी पहिला गिअर पडलाय. 

Updated: Aug 20, 2014, 10:09 PM IST
मुंबई-अहमदाबाद प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी पहिला गिअर title=

नवी दिल्ली : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची उदघाटन एक्सप्रेस जोरात दिसत आहे. पुण्याच्या मेट्रोला मागे टाकत नागपूर मेट्रो सुसाट आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात नागपूर मेट्रोला मंजुरी दिली. उद्या मोदींच्या हस्ते नागपूर मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. तर मुंबई-अहमदाबाद या देशातल्या पहिल्या प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी पहिला गिअर पडलाय. 

प्रवासासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी. मुंबई-अहमदाबाद या देशातल्या पहिल्या प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी पहिला गिअर पडलाय. ही बुलेट ट्रेन कशी असेल, यासंदर्भात अभ्यास आणि रिसर्च करणा-या जर्मनीच्या एका सल्लागार कंपनीनं पहिला अहवाल महाराष्ट्र सरकारला सादर केलाय. ही बुलेट ट्रेन स्टँण्डर्ड गेजची असावी, दुहेरी मार्ग असावा, जास्तीत जास्त वेग 350 किमी असावा, हे सगळे मुद्दे अहवालात मांडण्यात आलेत.

राज्यात साधारणपणे १२० किमीचा मार्ग या बुलेट ट्रेनचा असेल. या मार्गावर बीकेसी, ठाणे, विरार, डहाणू, बिलीमोरा अशी स्टेशन्स असणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे भविष्यात मुंबई-पुणे बुलेट ट्रेन धावणं शक्य होण्यासाठीच बुलेट ट्रेनचा मार्ग हा ठाणे शहर परिसरातून नेण्यात आला आहे.

ठाण्याच्या खाडीखालून हा मार्ग प्रस्तावित असेल. काही ठिकाणी पर्यावरण आणि इतर परवानग्या आवश्यक आहेत. असं जर्मनीच्या या कंपनीनं पहिल्या अहवालात म्हंटलंय. या कंपनीचा दुसरा अहवाल डिसेंबरपर्यंत सादर होणार आहे. तर संपूर्ण प्रकल्पाचा अहवाल मे 2015 पर्यन्त येणं अपेक्षित आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.