नकाराधिकाराचं मोदींकडून स्वागत!

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या मतदान नाकारण्याचा अधिकार` या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Updated: Sep 27, 2013, 09:42 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या नकाराधिकाराच्या निर्णयाचं स्वागत केलंय.
'मी या निर्णयाचं हार्दिक स्वागत करतो', असं नरेंद्र मोदींनी त्यांच्या ब्लॉगवर लिहिलंय. माननीय सर्वोच्च न्यायालयाने उमेदवार नाकारण्याचा अधिकार मतदारांना दयावा, असे निवडणूक आयोगाला निर्देश दिलेत.
'मी मनापासून या निर्णयाचे स्वागत करतो. हा निर्णय आपल्या लोकशाहीवर मोठा प्रभावकारी असेल, अशी आशा मी करतो. या निर्णयामुळे आपली लोकशाही पूर्वीपेक्षा सशक्त आणि आकर्षक होईल. मी या नकाराधिकाराचं नेहमीच समर्थन केलंय' असं मोदी म्हणतात.
यंत्रावर नकाराधिकाराच्या बटनामुळे मतदारांना या अधिकारामुळे पक्षाचे उमेदवार आणि धोरण आवडत नाहीत, अथवा उमेदवार योग्य नाहीत याबाबतचा संदेश देता देईल.
यासोबतच मोदींनी तरूणांना मतदार यादीत नाव नोंदविण्याचं आणि मतदान करण्याचं आवाहन केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.