मोदी लंडनला रवाना, डॉ. आंबेडकरांच्या घराचा लोकार्पण सोहळा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराचा लोकार्पण सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ब्रिटन दौऱ्यावर आहेत. 

Updated: Nov 12, 2015, 10:38 AM IST
मोदी लंडनला रवाना, डॉ. आंबेडकरांच्या घराचा लोकार्पण सोहळा  title=

नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराचा लोकार्पण सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ब्रिटन दौऱ्यावर आहेत. 

या दौऱ्यादरम्यान मोदींच्या हस्ते लंडनमधील बाबासाहेब आंबडेकऱ्यांच्या घराचं लोकार्पण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारनं लंडमधील बाबासाहेबांचं घर विकत घेतल्यानंतर त्या घराचं लोकार्पण प्रलंबित होतं. ब्रिटन दौऱ्याच्या नियोजित कार्यक्रमानुसार सुरूवातीला पंतप्रधान मोदी ब्रिटनचे पंतप्रधान कॅमेरून यांची भेट घेतील.

ब्रिटनच्या संसदेत भाषण केल्यानंतर मोदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घराकडे रवाना होतील. ब्रिटनचे पंतप्रधान कॅमरून यांच्या उपस्थित मोदींच्या हस्ते बाबासाहेबांच्या घराचा लोकार्पण सोहळा पार पडेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पाच दिवसांच्या परदेश दौ-यावर रवाना झालेत. त्यात ब्रिटन भेट आणि जी-२० परिषदेचा प्रामु्ख्याने समवेश आहे. विशेष म्हणजे या दौ-यात मोदी लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचंही उद्धाटन करणार आहेत. सुमारे दहावर्षांनंतर भारतीय पंतप्रधान प्रथमच ब्रिटनला भेट देत आहेत. 

ब्रिटीश संसदेच्या विशेष अधिवेशनात मोदी भाषणही करणार आहेत. तीन दिवसांच्या  दौ-या दरम्यान मोदी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांच्याशी चर्चाकरणार आहेत. संरक्षण, व्यापार, दाऊद इब्राहीमवरील कारवाई या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरी यांनी आरोजीत केलेल्या बंकिंगहॅम पॅलेस येथील मेजवानीत प्रमुख पाहुणे म्हणून मोदी उपस्थिती लावतील. 

याशिवायते जॅग्वार लँण्ड लोव्हरच्या प्रकल्पालाही भेट देणार आहेत. या कार्याक्रमानंतर मोदी जी-२० परिषदेसाठी तुर्कस्थानला रवाना होतील. यात परिषदेत काळा पैसा कर यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते प्रकाश टाकतील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.