नेताजींच्या पणतूंचा भाजपमध्ये प्रवेश

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र बोस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

Updated: Jan 25, 2016, 05:32 PM IST
नेताजींच्या पणतूंचा भाजपमध्ये प्रवेश title=

हावडा : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र बोस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये चंद्र बोस भाजपचे सदस्य बनले आहेत. हावडामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका रॅलीमध्ये चंद्र बोस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी अमित शहा यांनी चंद्र बोसना भाजपचा झेंडा दिला.

शनिवारीच केंद्र सरकारनं नेताजींबाबतच्या 100 फाईल्स सार्वजनिक केल्या होत्या. त्यामुळे नेताजींच्या कुटुंबानी मोदी सरकारचे आभार मानले होते, आणि आता चंद्र बोस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  पुढच्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यातच चंद्र बोस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या निवडणुकांमध्ये भाजपकडे कोणताही चेहरा नव्हता, त्यामुळे आता चंद्र बोस भाजपचा किती फायदा करुन देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.