'तलाक...तलाक...तलाक' म्हणून सुटका होणार नाही...

'तलाक... तलाक... तलाक'... केवळ हा एकच शब्द तीन वेळा उच्चारून पत्नीपासून घटस्फोट मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण बदल करण्याची शिफारस एका उच्च स्तरीय समितीने केलीय. 

Updated: Jul 10, 2015, 03:26 PM IST
'तलाक...तलाक...तलाक' म्हणून सुटका होणार नाही...   title=

लखनऊ : 'तलाक... तलाक... तलाक'... केवळ हा एकच शब्द तीन वेळा उच्चारून पत्नीपासून घटस्फोट मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण बदल करण्याची शिफारस एका उच्च स्तरीय समितीने केलीय. 

मुस्लिम घटस्फोटात महत्त्वपूर्ण बदल करण्याची शिफारस करणारा अहवाल या समितीनं महिला व बालकल्याण विकास खात्याकडे सोपवलाय. या शिफारसीनुसार तोंडी तीन वेळा तलाक बोलून लग्न मोडण्याच्या परंपरेला बंद करण्याची मागणी केलीय.  समितीच्या म्हणण्यानुसार, तलाक घेण्याच्या या पद्धतीमुळे पती-पत्नीमच्या जीवनात अस्थिरता निर्माण होते. 

सध्या, टेक्नॉलॉजीच्या युगात एसएमएस, फेसबुक किंवा स्काईपवरही एकतर्फी 'तलाक... तलाक... तलाक' म्हणत फारकत घेण्याच्या घटनांत वाढ झाल्याचंही या अहवालात म्हटलं गेलंय. 

बऱ्याच इस्लामिक देशांतही तीन वेळा 'तलाक' म्हणत फारकत घेण्याची परंपरा केव्हाच मोडीत निघालीय. पण, भारतात मात्र 'मुस्लिम पर्सनल लॉ' अजूनही तोंडी आणि एकतर्फी तलाक बोलून फारकत घेण्याचं समर्थन करतोय.  

मुस्लिम धर्मगुरूंनी मात्र या शिफारशींना तीव्र शब्दांत निषेध केलाय. धर्मगुरूंच्या म्हणण्यानुसार मुस्लिम कायद्यामध्ये बदल करण्याची काहीही गरज नाही.

पंजाब विद्यापीठातील माजी प्रोफेसर डॉ. पैम राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली मे २०१४ मध्ये स्थापन केलेल्या या समितीने दिलेल्या अहवालात, लग्न आणि घटस्फोट यासाठी हिंदू तसेच मुस्लिम कायद्यात बदल करण्याच्या सूचना करण्यात आल्यात. तसंच सगळ्या धर्मातील विवाहांची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात यावं, अशीही शिफारस या अहवालात करण्यात आलीय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.