आता रिलायन्स कंपनी भारतीय रेल्वेला डिझेल पुरवणार

मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड पहिल्यांदाच भारतीय रेल्वेला डिझेलचा पुरवठा करणार आहे. ऑक्टोबरमध्ये सरकारनं डिझेलच्या किमतीवरील असणारे नियंत्रण काढून घेतले होते. याच पार्श्वभूमिवर  रिलायन्स इंडस्ट्रीजने हा करार केला आहे. 

Updated: Jul 16, 2015, 05:47 PM IST
आता रिलायन्स कंपनी भारतीय रेल्वेला डिझेल पुरवणार  title=

मुंबई: मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड पहिल्यांदाच भारतीय रेल्वेला डिझेलचा पुरवठा करणार आहे. ऑक्टोबरमध्ये सरकारनं डिझेलच्या किमतीवरील असणारे नियंत्रण काढून घेतले होते. याच पार्श्वभूमिवर  रिलायन्स इंडस्ट्रीजने हा करार केला आहे. 
मागील वर्षापर्यंत रेल्वे फक्त सरकारी कंपन्यांकडून डिझेल खरेदी करत होती. ज्याच्या तोट्याची भरपाई सरकार करत होते. पण सरकारनं किमतीवरील नियंत्रण काढून घेतल्यावर मात्र इतर कंपन्यांनी आपले नशीब आजमवायचा प्रयत्न केला. 
रिलायन्स तसंच एस्सार ऑईल हे दोन समूह यात मोठे खिलाडी होते. देशात सगळ्यात जास्त डिझेलचा खप हा रेल्वेसाठी केला जातो. दरवर्षी  रेल्वेसाठी अडीज लाख मिलियन टन खर्च होतात. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.