हे काय! NSG आधिकारी निघाला पाकचा हेर?

गृहमंत्रालयातील एका कर्मचाऱ्याला संवेदनशील माहिती लीक करण्याचा आरोपात पकडल्याच्या २४ तास होत नाही तोपर्यंत नॅशनल सेक्युरिटी गार्ड (ब्लॅक कॅट कमांडो) या संरक्षण संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला पाकिस्तानात संशयास्पदपणे बोलताना पकडले आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 5, 2013, 06:53 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
गृहमंत्रालयातील एका कर्मचाऱ्याला संवेदनशील माहिती लीक करण्याचा आरोपात पकडल्याच्या २४ तास होत नाही तोपर्यंत नॅशनल सेक्युरिटी गार्ड (ब्लॅक कॅट कमांडो) या संरक्षण संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला पाकिस्तानात संशयास्पदपणे बोलताना पकडले आहे.
पाकिस्तानातून आलेल्या या फोन कॉलमधील समोरचा व्यक्तीला हैदराबाद स्फोटासंबंधी चौकशीची माहिती जाणून इच्छीत होता. या प्रकरणी ज्या अधिकाऱ्यांची वर्तणूक संशयास्पद आहे, तो मेजर रँकचा अधिकारी आहे. तो डेप्युटेशनमुळे एनएसजीमध्ये आला होता.
हैदराबाद स्फोटांनंतर एनएसजीची टीम स्फोटांचे विश्लेषण करण्यासाठी घटनास्थळी पोहचली होती. गृहमंत्रालय आणि आयबी या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. ऑफिसरला विचारण्यात आले की त्याने पाकिस्तानातून आलेला अज्ञात कॉल रिसीव का केला.
दरम्यान, चौकशीच्या फेऱ्यात आलेल्या अधिकाऱ्याने पाकवरून आलेल्या फोनवर कोणतीही संवेदनशील माहिती सांगितली नसल्याचा एनएसजी अधिकाऱ्यांनी दावा केला आहे. दरम्यान, पाकिस्तानातून कोणी कॉल केला होता, याचा अजून तपास सुरू आहे.