अरे बापरे.... १५ फुटाचा किंग कोब्रा

सर्वसाधारण १० फुटापर्यंत या प्रकाराचा साप आढळतो. मार्, १५ फुटी साप आढळलाय. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात १५ फुटी `किंग कोब्रा` सापडला. या प्रजातीचा साप हा जगातील सर्वाधिक लांबीचा विषारी साप म्हणून ओळखला जातो.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 17, 2014, 11:12 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, हैदराबाद
सर्वसाधारण १० फुटापर्यंत या प्रकाराचा साप आढळतो. मार्, १५ फुटी साप आढळलाय. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात १५ फुटी `किंग कोब्रा` सापडला. या प्रजातीचा साप हा जगातील सर्वाधिक लांबीचा विषारी साप म्हणून ओळखला जातो.
`किंग कोब्रा` या प्रजातीचा सापला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. वन विभागाने तब्बल चार तासांच्या परिश्रमानंतर या सापाला पकडण्यात यश मिळवले. पकडलेला साप ही मादी असून, गर्भवती असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विशाखापट्टणमच्या प्राणिसंग्रहालयात या सापाला ठेवण्याचा विचार होता, जेणेकरून तो प्रेक्षकांना पाहता येईल.
मात्र, साप प्राणिसंग्रहालयातील अन्य प्राण्यांसाठी धोकादायक ठरू शकतो, त्याशिवाय त्याला सांभाळणे परवडण्यासारखेही नाही, अशी सबब प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून सांगण्यात आली असून प्राणी संग्रालयात ठेवण्यास नकार दिलाय. त्यामुळे या सापाला विशाखापट्टणम आणि पूर्व गोदावरी जिल्ह्यादरम्यान असलेल्या घनदाट जंगलात सोडून देण्यात आले.
ऑस्ट्रेलियामध्ये सर्वसाधारण १५ ते १८ फुटांपर्यंत किंग कोब्रा आढळतात. मात्र भारतात एवढय़ा लांबीचा हा साप आढळल्याने हे एक आश्चर्यच आहे, असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.