ओला, उबेर टॅक्सीला जोरदार झटका, जादा पैसे घेल्याने १८ कार जप्त

ओला आणि उबेर यांच्या १८ टॅक्सी दिल्ली सरकारने जप्त केल्यात. ग्राहकांकडून प्रवासाचे अतिरिक्त शुल्क आकारल्यामुळे ही जप्ती केलीय.

PTI | Updated: Apr 19, 2016, 05:53 PM IST
ओला, उबेर टॅक्सीला जोरदार झटका, जादा पैसे घेल्याने १८ कार जप्त title=

नवी दिल्ली : ओला, उबेर या टॅक्सीविरोधात स्थानिकांकडून तीव्र संताप होत आहे. दिल्लीत टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या ओला आणि उबेर यांच्या १८ टॅक्सी दिल्ली सरकारने जप्त केल्यात. ग्राहकांकडून प्रवासाचे अतिरिक्त शुल्क आकारल्यामुळे सरकारने ही जप्ती आणली आहे.

राजधानी दिल्लीत सम-विषम वाहतूक योजना लागू आहे. असे असताना ग्राहकांकडून प्रवासाचे अतिरिक्त शुल्क आकारल्यामुळे ओला आणि उबेर या कंपनीच्या १८ टॅक्सीवर सरकारने जप्ती आणली.

'आप' सरकारचा उपक्रम 

दिल्लीत सध्या १५ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान दुसऱ्या टप्प्यात सम-विषम वाहतूक योजना राबविण्यात येत आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी दिल्लीतील 'आप' सरकार प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या सम-विषम सेवेला प्राधान्य देताना त्याचे समर्थन केलेय.

भाजपने नियम मोडला म्हणून...

काल भाजपचे खासदार विजय गोयल यांनी सम-विषम वाहतुकीचा नियम मोडला. त्यांचे गांधीकरुन स्वागत केले गेले. त्यांची गाडी अडवून दिल्ली पोलिसांनी त्यांना गुलाबाचे फुल देऊन नियम पाळण्याचे आवाहन केले. त्यानंतर आज जादा शुल्क आकारल्याबद्दल टॅक्सी सेवा देणाऱ्या या दोन प्रमुख कंपन्यांवर कारवाई करण्यात आलेय.

का केली कारवाई?

ओला आणि उबेर या टॅक्सी कंपन्या अतिरिक्त शुल्क आकारणी करतात अशा ग्राहकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. त्यामुळे आम्ही या कंपन्यांच्या टॅक्सी जप्त केल्या आहेत. त्यापैकी बहुतांश टॅक्सी या उबेरच्या आहेत, अशी माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने दिली.

टॅक्सी सेवा देण्याच्या नावाखाली ग्राहकांकडून अधिकचे पैसे उकळविण्यात येत होते. त्यामुळे ‘सर्ज प्राइसिंग‘ बंद केले. याअंतर्गत ग्राहकांकडून मागणी कमी असेल अशा वेळी देखील टॅक्सी सेवा देण्यासाठी अतिरिक्त पैसे घेण्यात येत होतेत.