एटीएममधून पैसे काढण्याच्या बहाण्याने त्यांनी १०० जणांना लुटले

दिल्ली : एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत देण्याच्या बहाण्याने १००हून अधिक जणांना लुटणाऱ्या टोळीला दिल्ली पोलिसांनी जेरबंद केलंय. 

Updated: Feb 1, 2016, 11:21 AM IST
एटीएममधून पैसे काढण्याच्या बहाण्याने त्यांनी १०० जणांना लुटले title=

दिल्ली : एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत देण्याच्या बहाण्याने १००हून अधिक जणांना लुटणाऱ्या टोळीला दिल्ली पोलिसांनी जेरबंद केलंय. १०० पेक्षा जास्त व्यक्तींची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 

हा तरुण आणि त्याचे साथीदार लोकांना एटीएममधून मदत करण्याच्या बहाण्याने त्यांना फसवत असत. या टोळीत जवळपास २५ व्यक्ती असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या टोळीतील एक व्यक्ती एटीएममध्ये लोकांना पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने जात असे. लोकांनी आपला सिक्युरिटी पिन क्रमांक टाकल्यावर धनराशी रक्कम जेव्हा टाकत असे तेव्हा व्यक्तीचे लक्ष विचलित करुन 'क्लिअर' बटण दाबत असे.

यानंतर गँगमधील बाहेर उभी व्यक्ती आत येऊन एटीएम खराब असल्याची बतावणी करत असे. हे ऐकल्यावर बहुतेक ग्राहक आपला व्यवहार रद्द न करताच तिथून निघून जात असत. यानंतर हे लोक ती रक्कम काढून लंपास करत.

काही वेळेस तर हे ग्राहकांकडून त्यांचे एटीएम पिन जाणून घेऊन त्यांच्याकडील कार्ड घेऊन बदल्यात आपले कार्ड देत असत.यापूर्वीही हरयाणा पोलिसांनी या टोळीतल्या काही जणांना अटक केली हो