पॅनकार्डधारकांनो सावधान; नोटीस मिळेल

पॅनकार्डधारकांना आता अधिक सर्तक राहावे लागणार आहे. कारण केव्हाही कारणे दाखवा नोटीस हातात पडू शकेल. करसंकलन वाढवण्याच्या दृष्टीने सरकारने प्रयत्न वाढवले आहे. त्यामुळे पॅनकार्डधारकांना नोटीस बजावण्याचे धोरण सरकार अबलंबिले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 13, 2013, 01:12 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
पॅनकार्डधारकांना आता अधिक सर्तक राहावे लागणार आहे. कारण केव्हाही कारणे दाखवा नोटीस हातात पडू शकेल. करसंकलन वाढवण्याच्या दृष्टीने सरकारने प्रयत्न वाढवले आहे. त्यामुळे पॅनकार्डधारकांना नोटीस बजावण्याचे धोरण सरकार अबलंबिले आहे.
करसंकलन वाढवण्याच्या दृष्टीने सरकारने प्रयत्नाचा एक भाग म्हणून पॅनकार्डधारकांना नोटीस पाठवण्यात येत आहे. ज्यांनी विवरणपत्र सादर केलेले नाही अशा ३५,१७० पॅनकार्डधारकांना कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आली आहे. यामध्ये कर विवरण न सादर केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पाठविलेल्या नोटीसीमध्ये दिला आहे.
देशात सुमारे १२ लाख पॅनकार्डधारकांनी आपले विवरणपत्र सादर केलेले नाह. ही माहिती प्राप्तिकर खात्याने दिली आहे. १२ लाख पॅनकार्डधारकांशिवाय आणखी पॅनकार्डधारकांना यापुढे नोटीस बजावण्यात येणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेय.

कर भरण्यासाठी पात्र असणा-या पॅनकार्डधारकांचा तपास करण्यासाठी ऑनलाइन यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या आधारे संबंधित कर विवरण सादर न करणा-यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येत आहे. यामध्ये महत्त्वाच्या प्रकरणांवर प्राप्तिकर कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.