आमदारांना पगारात चौपट वाढ मिळणार?

दिल्लीच्या आमदारांना जवळपास चौपट पगारवाढ हवीय, असा प्रस्ताव एका समितीनं मांडलाय. 21 ऑगस्ट रोजी ही समिती गठित करण्यात आली होती. 

Updated: Oct 6, 2015, 06:00 PM IST
आमदारांना पगारात चौपट वाढ मिळणार? title=

नवी दिल्ली : दिल्लीच्या आमदारांना जवळपास चौपट पगारवाढ हवीय, असा प्रस्ताव एका समितीनं मांडलाय. 21 ऑगस्ट रोजी ही समिती गठित करण्यात आली होती. 

विधानसभा अध्यक्षांसमोर हा प्रस्ताव मांडण्यात आलाय. सध्या, दिल्लीतील आमदारांचा पगार हा महिन्याला 12,000 रुपये इतका आहे. समितीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला तर या आमदारांना महिन्याला 50,000 रुपये पगार मिळू शकेल. 

तसंच या प्रस्तावात इतर भत्तेही 6000 रुपयांवरून 30,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचं सुचविण्यात आलंय. 

महाराष्ट्राच्या आमदारांचा पगार माहीत आहे? पाहा... 
महाराष्ट्रातील आमदारांचा पगार डिसेंबर 2010 मध्ये वाढवण्याचा निर्णय विधानसभेनं मंजुर केला होता. विद्यमान आमदारांना 70 हजार रुपये मानधन, तर माजी आमदारांना 40 हजार रुपये पेन्शन आहे. याशिवाय आजी - माजी आमदारांना मानधन / पेन्शनशिवाय अन्य भत्ते आणि सवलतीही मिळतात.

या विधेयकामुळे आमदारांचे वेतन क्‍लास वन अधिकाऱ्यांच्या बरोबर नेऊन ठेवण्यात आलं होतं. त्यांचं मूळ वेतन 2000 होतं, ते 8000 करण्यात आलं. दूरध्वनिभत्ता दुप्पट करण्यात आला. वाहनभत्ता 25 हजारांहून 46 हजार रुपये करण्यात आला. लेखन आणि टपालभत्ता जो 7,500 होता तो 10 हजार रुपये करण्यात आला. याखेरीज बैठकभत्ता जो 500 रुपये होता, तो 1000 रुपये प्रस्तावित केला.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.