हार्दिक पटेल दुसरे अरविंद केजरीवाल?

पटेल पाटीदार समाजासाठी आंदोलन छेडणारे हार्दिक पटेल यांना दुसरे अरविंद केजरीवाल, असे म्हटले जात आहे. त्यांनी पाटीदार लोकांसाठी उभे केलेले आंदोलन देशात चर्चेचा विषय झाले आहे. मला राजकारण करायचे नाही. मी नेता नाही. लाखो पाटीदारांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन करत आहे, हार्दिक पटेल यांनी म्हटलेय.

Updated: Aug 26, 2015, 02:59 PM IST
हार्दिक पटेल दुसरे अरविंद केजरीवाल? title=

नवी दिल्ली : पटेल पाटीदार समाजासाठी आंदोलन छेडणारे हार्दिक पटेल यांना दुसरे अरविंद केजरीवाल, असे म्हटले जात आहे. त्यांनी पाटीदार लोकांसाठी उभे केलेले आंदोलन देशात चर्चेचा विषय झाले आहे. मला राजकारण करायचे नाही. मी नेता नाही. लाखो पाटीदारांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन करत आहे, हार्दिक पटेल यांनी म्हटलेय.

आम्हाला आरक्षण दायचे असेल तर प्रेमाने द्या नाहीतर आम्हाला खेचून आणावे लागेल. 20 टक्के पटेल समाज आहे. ओबीसीअंतर्गत हे आरक्षण द्यावे. शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण द्या आदी मागण्या हार्दिक पटेल यांनी केल्या आहेत. या मागण्यांसाठी अहदाबादमध्ये मोठे आंदोलन उभारले गेले आहे. या आंदोलनाची तुलना आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनाशी केले जात आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनापेक्षा हे आंदोलन मोठे असेल, असे हार्दिक पटेल यांनी म्हटलेय. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाची चर्चा सुरु झाली आहे.

पाहा व्हिडिओ - हार्दिक पटेल यांच्या पाठिमागे कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हार्दिक पटेल यांनी थेट इशारा देताना आंदोलनातून शह दिला आहे. हार्दिकच्या पाठीमागे कोण आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनापेक्षा हे मोठे असेल, असे हार्दिक पटेल यांनी म्हटलेय. त्याचवेळी विरोधकांनी हार्दिक पटेल यांचे आंदोलन केजरीवाल यांच्या पावलावर जाईल, असे म्हटले आहे. त्यामुळे हार्दिक पटेल दुसरे केजरीवाल आहेत का, याची चर्चा सुरु झाली आहे. गुजरातमध्ये केजरीवाल हार्दिक पटेल आहे का? हार्दिक पटेल यांच्या आंदोलनामागे कोण आहे, याचीही चर्चा सुरु आहे. दरम्यान, गुजरात सरकारने केंद्राकडे मदतीसाठी धाव घेतली असून अहमदाबादमध्ये संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे हे आंदोलन चिरडले जाईल की चिघळलेल, याबाबत भीती व्यक्त होत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.